पुण्यात ‘स्पुतनिक 5’ लसीचा 17 स्वयंसेवकांना डोस
पुणे | प्रतिनधी
देशात व राज्यात कोरोनाच्या लसीची चाचणी सुरु आहे. हि लस अंतिम टप्यात आली असल्याचे चित्र आहे. भारतात रशियाच्या ‘स्पुतनिक 5’ या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील नोबेल रुग्णालयात या लसीची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 17 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. 18 वर्षां खालील हे स्वयंसेवक असून त्यांना सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. या सर्व स्वयंसेवकांवर या लसीचा कसा परिणाम होतो, याचे निरिक्षण केले जाणार आहे.
सध्या देशात फायझर आणि सीरम या दोन कंपन्यांनी लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. अशातच पुण्यात रशियाच्या ‘स्पुतनिक 5’ या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात झाली आहे. रशियाने सर्वात आधी कोरोनावरील प्रभावी तयार केल्याचा दावा केला होता. त्यांतर या देशाने लसीकरणालाही सुरुवात केली आहे. ही लस कोरोनावर 95 टक्के प्रभावी असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. तसेच या लसीचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम नस्ल्याचा दावा ते करत आहेत. रशियात हजारो लोकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
या बरोबरच अमेरिकन औषध कंपनी फायझरने भारतात लसीकरणासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. त्या नंतर आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्युनेही भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. दरम्यान, कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागणारी सीरम ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. अशातच रशियाच्या ‘स्पुतनिक व्ही’ लसीचा डोस पुण्यातील 17 स्वयंसेवकांना देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात आली असल्याचे चित्र सध्या तरी आहे.