breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल ?

पावसाळा आता सुरू झालेला आहे. या दिवसात वातवरणात सतत बदल होत असतात. पण या वातावरणातील बदलांचा आपला त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे काळजी घेणे गरजेचं असतं.  साचलेल्या पाण्यातून जातानाही त्वचासंसर्ग होऊ शकतो.तर हे सर्व टाळण्यासाठी पावसाळ्यात त्वचेसंबधी काय काळजी घ्यावी ते पाहुया.


1-वातावरणातील आद्रतेमुळे त्वचा ओलसर असते. यामुळे या दिवसात सनस्क्रीन लावणे शक्यतो टाळावे. किंवा थोड्या मात्रेत घेऊन लावावे.

2-पावसाळ्यात जास्त मेकअप करणे टाळावे. वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करण्याच प्रयत्न करावा.

3-या दिवसांत ब्लीच आणि फेशियल करणे शक्यतो टाळावे कारण चेहऱ्यावरील त्वचा खरखरीत होण्याची शक्यता असते.

4- पावसाळ्यात गडद रंगाची लिपस्टीक वापरणे टाळावे. ओठ फुटल्याचे जाणवल्यास त्यावर नारळाच्या तेलचा किंवा तुपाचा वापर केल्यास उत्तम.

5- पावसाळ्यात त्वचेसंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते ते टाळण्यासाठी कडुलिंबाची पाने अंघोळ करताना गरम पाण्यात टाकून आंघोळ करावी. त्याने आपल्याला ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते

त्वचेप्रमाणे पावसाळ्यात आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. आपण खाल्लेल्या अन्नातून अनेक आजार होण्याची
शक्यता असते. आणि रोग प्रतिकार शक्तीवरही परिणाम होतो.  सध्या कोरोना पासून बचाव करण्यासाठी तर नक्कीच आरोग्याची पावसाळ्यात काळजी घेणं गरजेच आहे. त्यासाठी काय करता येईल ते पाहुया.

1-  पावसाळ्यात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याने त्वचा देखील कोरडी होत नाही.

2-सर्व फळे आणि भाज्या, धुवून मगच खा.


3- शरीर उबदार ठेवा कारण शरीरातील तापमान कमी झाल्यास व्हायरल फ्ल्यु होण्याची शक्यता असते. 

4- सूप आणि गरम केलेले अन्न खावे. ते आपल्या त्वचेस पोषक असतं.

5-लसूण, मिरपूड, आले, हळद, जिरा पावडर आणि धणे आपल्या आहारात समाविष्ट कराव्यात त्यामुळे अपचन होण्याची शक्यता कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

6- शरीराची स्वच्छता ठेवा आणि उघड्यावरचे अन्न खाणे  टाळाचं. 


7- निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. 

 8- तसेच मास्क घातल्या शिवाय घराबाहेर पडू नये..आणि पावसात जाताना मास्क भिजू नये याची काळजी घ्यावी. त्यासाठी शक्यतो घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट घातल्याशिवाय बाहेर पडू नये.

9- बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ  धुवावे किंवा शक्य असल्यास गरम पाण्याने अंघोळ करावी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्यात निलगीरिच्या तेलाचा नक्कीच वापर करावा.बाहेर जाताना शक्य असल्यास थोडसं निलगिरीचं तेल कपड्यांवर शिंपडावं. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button