धक्कादायक! काँग्रेस खासदाराचं कोरोनाने निधन, राहुल गांधींसह पंतप्रधान मोदींकडून दुःख व्यक्त
चेन्नई: काँग्रेसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंत कुमार यांचं कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झालेलं आहे. त्यांच्यावर 10 ऑगस्टपासून चेन्नईमधील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी (28 ऑगस्ट) रात्री उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. त्यांच्या निधनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राजकीय वर्तुळातील अनेकांनी दुःख व्यक्त केलेलं आहे.
खासदार वसंत कुमार दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले होते. 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झालेले आहेत. राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत म्हटलं, “काँग्रसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोव्हिड 19 मुळे झालेलं निधन खूप धक्कादायक आहे. त्यांची लोकांची सेवा करण्याच्या काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना.”
The news of Kanyakumari MP, Shri H Vasanthakumar’s untimely demise due to Covid-19 has come as a shock.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 28, 2020
His commitment to the congress ideology of serving the people will remain in our hearts forever.
Heartfelt condolences to his friends and family members. pic.twitter.com/oqhrfQXEUD