breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

द्राक्ष खाल्ल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे

उन्हाळा एक असा ऋतू आहे की ज्यात कोणकोणती फळे खावीत असा प्रश्न पडलेला असतो. या ऋतूत अनेक फळे उपलब्ध असतात. आंब्यासह संत्री, मोसंबी, पेर,चिकू, द्राक्ष, कलिंगड यांसारखी बरीच फळे उन्हाळ्यात उपलब्ध असतात. तशी तर सर्वच फळे शरिरासाठी फायदेशीर असतात.. पण आज आपण जाणून घेणार आहोत द्राक्षाबद्दल…द्राक्ष खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात…

द्राक्षांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह ‘क’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. तसचे द्राक्षांमध्ये असलेले फ्रुटोज आणि ग्लुकोज रक्तात सहजपणे शोषले जाते आणि ज्यामुळे थकवा दूर होतो.तर जाणून घेऊयात द्राक्षामुळे होणारे शरीराला फायदे

द्राक्षामुळे शरीराला होणारे फायदे :

1. द्राक्षाने रक्तदाब नियंत्रित राहतो. उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी आठवड्यातून तीन-चार वेळा द्राक्षाचे सेवन करा.

2. मायग्रेनचा त्रास होणा-यांना द्राक्षांचा रस फायदेशीर ठरेल.

3. द्राक्षांमध्ये कॅल्शिअम असल्यामुळे हाडे मजबूत होतात.

4. द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ‘ई’ जीवनसत्व असल्यामुळे केस गळणे आणि केस पांढरे होणे यांसारख्या समस्या दूर होतात.

5. द्राक्ष खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणा-या वेदना आणि जळजळ कमी होते.

6. द्राक्षामुळे पित्त, अपचन यांपासून आराम मिळतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button