breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

दुधासोबत ‘या’ पदार्थांचं सेवन करू नये

निरोगी आरोग्यासाठी नियमित दुधाचे सेवन करणं अतिशय महत्त्वाचे आहे. दुधाचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. आयुर्वेदानुसार काही पदार्थांचे दुधासोबत सेवन करणे टाळले पाहिजे. आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी ही काळजी घेणे गरजेचं आहे. आयुर्वेदामध्ये दुधास अतिशय महत्त्व आहे. प्राचीन काळापासून दूध एक पौष्टिक आहार मानला जातो. कित्येक पाककृतींमध्ये दुधाचा वापर केला जातो. दुधामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषकतत्त्वांचा समावेश आहे. केवळ शाकाहार करणाऱ्यांसाठी दूध हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. दुधामुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. पण काही पदार्थांसोबत दूध पिणं शरिरासाठी घातक ठरू शकत…

आयुर्वेदानुसार दूध पिण्याची देखील वेळ असते. या वेळेनुसार दूध प्यायल्यास आरोग्यास सर्वाधिक लाभ मिळतात. सुदृढ शरीर हवे असल्यास सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी दूध प्या. टॉनिक म्हणून अश्वगंधासह दुधाचे सेवन केले जाऊ शकते. यामुळे चांगली झोप येते आणि स्मरणशक्ती देखील वाढते. त्रिफळासह दूध प्यायल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारते. आयुर्वेदानुसार अन्य कोणत्याही अन्नपदार्थांसोबत दुधाचे सेवन करणं टाळावं कारण यामुळे पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. जेवणानंतर दोन तासांनी दुधाचं सेवन करू शकतो.

दूध आणि फळे

दूध आणि फळे ज्युसरमध्ये वाटून स्मूदी पिण्याचा ट्रेंड सुरू आहे. बहुतांश जण दूध आणि फळे एकत्र करून मिल्कशेक तयार करतात आणि त्याचे सेवन करतात. आयुर्वेदानुसार केळी, स्ट्रॉबेरी, अननस, संत्रे यांसारख्या फळांमुळे पचन प्रक्रियेदरम्यान पोटामध्ये गरमी वाढते. तर दुसरीकडे दूध निसर्गतः थंड असते. दूध आणि फळ यांचे गुणधर्म पूर्णतः विरुद्ध असल्यानं उलट्यांचा त्रास होऊ शकतो किंवा पचन प्रक्रियेवर वाईट परिणाम होतो. यामुळे सर्दी, खोकला, पडसे यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

दूध आणि मासे

दूध आणि मासे कधीही एकत्र खाऊ नयेत किंवा मासे खाल्ल्यानंतर लगेचच दूध पिऊ नये, हे तुम्हाला माहिती असेलच. कित्येक पाककृतींमध्ये दुधाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ व्हाइट सॉस पास्ता मध्ये दुधाचा वापर केला जातो. या पास्तामध्ये चिकनचाही समावेश केला जातो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, आयुर्वेदामध्ये दुधाला संपूर्ण आहाराचा दर्जा देण्यात आला आहे. शरीरामध्ये दूध पचण्यास वेळ लागतो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्त्वांचा समावेश असतो. त्यामुळे दुधाचे अन्य कोणत्याही प्रोटीनयुक्त आहारासोबत सेवन केल्यास पचन प्रक्रिया बिघडू शकते.

कलिंगडसोबत दूध पिऊ नये

उन्हाळा सुरू झाला आहे. कडक उन्हामध्ये पाणीयुक्त फळांचे सेवन करण्यावर भर द्यावा. जेणेकरून शरीर हायड्रेट राहील. कलिंगड आपण कोणत्याही वेळी खाऊ शकतो. शरीर हायड्रेट ठेवण्यासह कलिंगड खाण्याचे कित्येक फायदे आहेत. कलिंगडमध्ये 96 टक्के पाण्याचा समावेश असतो. यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन अधिक प्रमाणात करावे. जेणेकरून उष्माघाताचा त्रास होणार नाही. कलिंगडमध्ये पोटॅशियम, फायबर यासह कित्येक पोषणतत्त्वांचा समावेश आहे. पण कलिंगडसोबत दूध पिणे म्हणजे कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण देण्यासारखे आहे.

डाळींसोबत दूधाचा वापर करू नये

स्वयंपाक करताना कित्येक डाळींची चव वाढवण्यासाठी काही जण दुधाचा वापर करतात. पण डाळी आणि दूध यांचे एकत्र सेवन करू नये. यामुळे पोटाच्या समस्या वाढून आरोग्यावर वाईट परिणाम होतात. डाळी आणि दुधाच्या सेवनामुळे पचन प्रक्रिया पूर्णतः बिघडते. विशेषतः उडदाच्या डाळीसोबत दूध कधीही पिऊ नये.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button