breaking-newsआरोग्य

त्वचेला सतत खाज येत असेल, तर ‘हे’ घरगुती उपाय कराच

दमट किंवा उष्ण वातावरणात शरीरावर सतत खाज येते. अशावेळी अतिप्रमाणात खाजवल्यास त्याजागी लाल डाग पडतात. काही वेळा त्वचेला हानी पोहोचून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया सतत सुटणाऱ्या खाजेवर काही घरगुती उपाय…

तुळस
बहुगुणी वनस्पती असलेल्या तुळशीचे सौंदर्य जपण्यापासून ते आजारावर तोडगा काढण्यापर्यंत अनेक फायदे आहेत. त्वचेवर खाज सुटल्यास त्या भागावर तुळशीची काही पाने चोळली किंवा तुळशीच्या पानांचा काढा काढून तो खाज येत असलेल्या भागावर लावल्यास काही काळाने आराम मिळेल.

कोरफड
खाज येणाऱ्या भागावर कोरफडीचा गर लावावा. गर काही काळ तसाच ठेवून थोड्या वेळाने तो भाग स्वच्छ पुसून घ्यावा. त्यामुळे खाजवल्याने त्वचेवर कोणत्याही प्रकारचे लाल पट्टे येत नाहीत.

खोबरेल तेल
एकाच जागी सतत खाजवल्याने शरीराच्या त्या भागावर लाल रंगाचे चट्टे येतात. अशावेळी त्या भागावर खोबरेल तेल लावावे, तेलामुळे थोडे थंड वाटेल आणि त्वचेवरील खाज कमी होईल.

लिंबू
शरीराला सतत खाज येत असेल, तर आंघोळीसाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. महत्त्वाचे म्हणजे आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा घातला तर एक दोन आठवड्यात त्वचेवरील खाजेपासून आराम मिळेल.

चंदन
त्वचेवरील ज्या भागाला खाज येत असेल तिथे चंदनाचा लेप लावल्यास खाजही दूर होते आणि अंगावरील दुर्गंदीही दूर होण्यास मदत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button