breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमुंबई

चक्क एक खेकडा; कोरोना लशीत निभावणार महत्त्वाची मोठी भूमिका

मुंबई: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जगभरात लशीसाठी प्रयत्न सुरू असताना आता हॉर्सशू क्रॅब हा खेकडा लशीच्या तपासणीत महत्त्वाची भूमिका बजावण्याची चिन्हं आहेत. या खेकड्याची रोगप्रतिकारक शक्ती पाहून शास्त्रज्ञही हैराण झाले आहेत. त्याचं विशिष्ट निळ्या रंगाचं रक्त कोव्हिड-19 विरोधातील लढाईत आता उपयोगात येण्याची शक्यता आहे. हॉर्सशू क्रॅब हा मानव आणि डायनोसरच्या आधीही 40 कोटी वर्षांपासून अस्तित्वात असल्याचं सांगितलं जातं. या प्रजातीच्या खेकड्याचं निळ्या रंगाचं रक्त मेडिकल सायन्समध्ये अमृत मानलं जातं. ज्याची किंमतही 11 लाख रुपये लीटर आहे. या रक्तापासून काही सेकंदातच सुरक्षित अशा पेशींची निर्मिती होते.

त्यामुळे त्याची रोग प्रतिकारकशक्ती खूप असते आणि तो इतर जीवांपेक्षा अधिक काळ जिवंत राहतो. 1970 मध्‍येच या खेकड्याचं रक्त लिम्युलस एमेबोसाईट लिजेट (LAL) या टेस्टसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आलेली होती. ताप तसंच मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या अनेक बॅक्टेरियांना ओळखण्यासाठी ही टेस्ट महत्त्वाची मानलेली जाते. अमेरिकेतील एका औषध कंपनीचे प्रमुख जॉन डबजॅक यांच्या हवाल्याने ‘यूएसए टुडे’च्या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, औषध कंपन्या ज्या औषधांसह लशी, मेडिकल उपकरणं बनवतात त्यांची गुणवत्ता अधिक वाढवण्यासाठी या टेस्टचं महत्त्व अधिक आहे. विशेष बाब म्हणजे या टेस्टचं नाव हॉर्सशू क्रॅबच्या लिम्युलस पॉलीफेमस या शास्त्रीय नावावरच ठेवण्‍यात आलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button