breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीने कशी काळजी घ्यावी ?

दिवसेंदिवस वाढत जाणा-या कोरोना व्हायरस रुग्णांच्या संख्येमुळे अनेक हॉस्पिटल्स भरून गेली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी कोविड सेंटर देखील बनविण्यात आले आहेत. या सर्वांचा विचार करता ज्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे शक्य नाही आणि रुग्णांचे घर खूप मोठे असून तेथे स्वतंत्र शौचालय असेल अशा रुग्णांना होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला जात आहे. तसेच कोरोनाची सौम्य लक्षणे असतील असेही रुग्णही होम क्वारंटाईन होऊ शकतात . घरात विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णाची त्याच्या कुटूंबियांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. शिवाय या दरम्यान त्या व्यक्तीने स्वत:ची आणि संपूर्ण घराची देखील काळजी घेणेही आवश्यक आहे.

यासाठी घरात विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तीचे कपडे, भांडी या योग्यरित्या निर्जंतुक करून धुतले पाहिजे. अन्यथा कोरोनाचे विषाणू घरात पसरण्याची शक्यता असते. घरात विलगीकरणासाठी राज्य सरकारने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोना व्हायरसचा हृदयावर परिणाम होतो का? जाणून घेऊयात नेमकी कशी काळजी घ्यायची ते.

घरात विलगीकरण केलेल्या व्यक्तीचे कपडे, भांडे कसे धुवावे?

  • कोरोना बाधित रुग्णाचे ताट, पाणी पिण्याचे ग्लास, कप, भांडी या वस्तू इतरांसोबत शेअर करु नका.
  • त्यांनी वापरलेली भांडी धुताना हातात ग्लव्ज घाला. ती चांगली धुवून निर्जंतुकीकरण करणा-या लिक्विडच्या पाण्यातून एकदा धुवून घ्या.
  • त्याचबरोबर त्यांनी वापरलेले कपडे, चादरी ही उबदार पाण्यात कपडे धुण्याची पावडर टाकून वा त्यात निर्जंतुकीकरण करणा-या लिक्विडमध्ये भिजत ठेवा. त्यानंतर हाताने कपडे धुवत असल्यास ग्लव्ह घाला. आणि वॉशिंग मशीन मध्ये धुवायला टाकणार असाल तर इतर कोणाचेही कपडे त्यांच्या कपड्यांसोबत धुवायला टाकू नका.
  • कपडे स्वच्छ धुतल्यानंतर गरम पाण्यात ते चांगले धुवून घ्या आणि कडक उन्हात वाळवण्यास ठेवा. जेणेकरुन त्यातील जंतू मरून जातील.
  • त्यांनी वापरलेल्या चादरी, अंथरुण धुण्यासाठीही हिच पद्धत वापरा.

हे सर्व करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे घरात विलगीकरण असलेल्या रुग्णाचे कपडे, भांडी धुताना तुमच्या हातात विघटनशील ग्लव्ज असणे आवश्यक आहे. त्याच ग्लव्ह्ज पुन्हा वापर करु नये. अशा पद्धतीने योग्य ती काळजी आपण घेऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button