breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा आयत्यावेळी रद्द; उमेदवारांमध्ये संताप

मुंबई – आरोग्य विभागातील गट क आणि ड संवर्गातील परीक्षा उद्या म्हणजेच 26 आणि 27 सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आल्या होत्या. मात्र सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे या परीक्षा आयत्या वेळी रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे काही परीक्षार्थी आपापल्या परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत. असे असताना ऐनवेळी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे आता चांगलाच गोंधळ उडाला आहे.

आरोग्य विभागातर्फे घेण्यात येणारी परीक्षा उद्यावर येऊन ठेपली आहे. परीक्षेसाठी उमेदवारांनी पूर्णपणे तयारी केली होती. मात्र ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय शुक्रवारी रात्री अचानकपणे घेण्यात आला. ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येईल, याबाबत सध्यातरी कोणतीही माहिती देण्याता आली नाही. मात्र, परीक्षार्थिंना मेसेजद्वारे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

सहा हजार दोनशे पदांसाठी परीक्षा

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील 2739 आणि गट ड संवर्गातील 3466 अशा एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यासाठी राज्यातील 1500 केंद्रावर एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार होती. ही भरती प्रक्रिया शासनाने निवडलेल्या खासगी बाह्य स्त्रोतांमार्फत केली जात आहे. उत्तर पत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याचे कारण काय ?

आरोग्य विभागातील भरती परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. यामागे सातत्याने येणाऱ्या तांत्रिक अडचणींचे कारण देण्यात आलेले आहे. तशा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या. काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेले नाही. काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटावर फोटो, केंद्र आणि वेळ देण्यात आलेला नाही. तसेच दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणं शक्य नाही, अशा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आसावा.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button