Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

Hadapsar News: मगरपट्टा परिसरात भर चौकात भरदिवसा मृतदेह टाकून पळ

हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर अज्ञात व्यक्तीने टेम्पोतून चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आणून टाकला. भर चौकात भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा येथील लोहिया उद्यानासमोर एक टेम्पो आला. या टेम्पोतून खाली उतरलेल्या दोन व्यक्तींनी चादरीत गुंडाळलेला एक मृतदेह टेम्पोतून बाहेर काढला आणि उद्यानासमोर तो मृतदेह टाकून देत त्यांनी पळ काढला.

यानंतर याठिकाणी जमा झालेल्या नागरिकांना या चादरीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी हा मृतदेह ताब्यात घेतला आहे. यातील मयताची ओळख अद्याप पटलेली नसून मृतदेह या ठिकाणी आणून टाकणाऱ्यांचा शोध घेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button