breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

फ्री एण्ड फेअर निवडणूका झाल्या असत्या तर भाजपाला 40 ही जागा मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरे यांचा आरोप

मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभेचा निकाल वादात सापडला आहे. या लोकसभा जागेवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा निसटता पराभव झाला आहे. तर एकनाथ शिंदे गटाचे नेते रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला आहे. EVM संबंधी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कालच केलेल्या आरोपानंतर या मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत ईव्हीएमबाबतचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. परंतू त्यानंतरही या मतमोजणी केंद्रात एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या प्रतिनिधीकडे असलेल्या मोबाईल फोनवरुन गुन्हा दाखल झालेला आहे, त्यातच आज शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी या मुंबई उत्तर पश्चिम निकालावरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाप्रमाणे देशातील इतरही मतदारसंघात निवडणूक यंत्रणेचा गैरवापर केलेला आहे. तर खरोखरच निवडणूक पारदर्शक झाली असती तर भाजपाला देशात 40 जागाही मिळाल्या नसत्या असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी उत्तर पश्चिम मतदार संघात झालेल्या गडबडीवरुन कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा आरोप केला आहे. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी आरोप केला आहे की निवडणूकीच्या मतमोजणीत19 फेरीनंतर जसा जसा निकालाचे आकडे जवळ जवळ येत होते तशी तशी पारदर्शकता बंद झाली. आधी प्रत्येक फेरीनंतर मतदानाचे आकडे आरओ अनाऊन्समेंट करुन सांगत होते. 19 फेरीनंतर ही प्रक्रिया बंद झाली. त्यानंतर थेट 22 व्या फेरीलाच आकडे सांगितल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

हेही वाचा     –      ग्राहकांना धक्का! ATM मधून रोख रक्कम काढणे महागणार

सहा मतदार संघ असले तर एआरओच्या टेबल जवळ एक लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी असतो. एक राऊंड झाल्यानंतर त्यांच्या समोर 14 टेबलची टॅली करुन हे आकडे सांगितले जातात. नंतर आरओला आकडे दिले जातात. परंतू यावेळी आमच्या प्रतिनिधीत आणि एआरओ यांच्यात प्रचंड अंतर होते. मोठी जाळी होती. ते काय करत आहेत हे कळत नव्हते असेही अनिल परब म्हणाले. उमेदवाराला 17 c फॉर्म दिला जातो. हा प्रत्येक ईव्हीएम मतपेटीत किती मते असतात ? ती मोजल्यानंतर ती किती आहेत ती दाखवून सही घेतली जाते. केंद्राध्यक्षाची सही करुन या 17 c फॉर्म प्रमाणे मते मतपेटीत मोजली का याची टॅली आपल्याला नंतर करुन खातर जमा करता येते. त्यानंतर फॉर्म 17 c part 2 हा देखील देण्याची तरदूत असते. यावेळी हा फॉर्म 17 c part 2 मागणी करुन ही दिला नाही. या फॉर्मद्वारे आमची मते आणि त्यांची मोजलेली मते याची टॅली होते. आमच्या आणि त्यांच्या मतात आमच्या मोजणीनूसार 650 मतांचा फरक आलेला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. 22 ते 23 फेरीनंतर एकदम मते जाहीर केल्याचे अनिल परब यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button