breaking-newsपुणेमहाराष्ट्र

पुणे – “तेजस्विनी’ आता दिवसभर

पुणे – जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत खास महिलांसाठी सुरू केलेल्या पीएमपीच्या “तेजस्विनी’ सेवेला चांगली पसंती मिळत आहे. महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी ठराविक वेळेतच ही सेवा सुरू करण्यात आली. पण, वाढता प्रतिसाद पाहता ही सेवा दिवसभर सुरू ठेवली जाणार आहे.

सध्या 10 मार्गांवर 32 बसेसमार्फत “तेजस्विनी’ची सेवा दिली जात आहे. या मार्गांवर दररोज 236 फेऱ्या होत आहेत. दररोज सरासरी 8 हजार महिला तेजस्विनीतून प्रवास करतात. पीएमपी प्रशासनाने “तेजस्विनी’ची सर्व माहिती ऑनलाइन उपलब्ध करुन दिल्याने प्रवासी संख्येत भर पडली आहे. सुरूवातीला महत्त्वाच्या 9 मार्गांवर ही सेवा सुरू करण्यात आली. मात्र, मागणी वाढल्याने स्वारगेट ते वडगाव-धायरी या मार्गावर देखील बससेवा सुरू करण्यात आली. शनिवार, आणि रविवार हे सुट्टीचे दिवशी या बसेस रिकाम्या धावतात. यासाठी प्रशासनाने रविवारी ही बस बंद करण्यात आली. दरम्यान, अन्य काही ठिकाणांवरून बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे. परंतु सध्या बसेसची संख्या कमी असून पुढील काळात जर बसेसची संख्या वाढली, तर मागणी असलेल्या मार्गांवर बस सुरू करण्याबाबत विचार केला जाणार आहे.
————
– जुने वेळापत्रक
सकाळी 7 ते 11
सायंकाळी 4 ते 8
——————
– नवे वेळापत्रक
सकाळी 6 ते 1
दुपारी 2 ते रात्री 10
———————-
काही महत्त्वाचे मार्ग
– स्वारगेट-वडगाव धायरी
– मनपा-वारजे माळवाडी
– शिवाजीनगर-कात्रज
– हडपसर-वारजे माळवाडी
– मनपा ते लोहगाव
—————

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button