breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या विस्तारित मार्गाला ‘हिरवा कंदील’

पुणे : पुणे मेट्रोच्या विस्तारित मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी नियोजनाच्या जोरदार हालचाली सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे महाविद्यालय स्थानक हे एकूण १२ किलोमीटरचे दोन मार्ग सुरू आहेत. हे मार्ग ६ मार्च २०२२ रोजी प्रवाशांसाठी सुरू झाले. त्यानंतर फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक या एकूण १३ किलोमीटरच्या विस्तारित मार्गांचे काम पूर्ण झाले आहे. विस्तारित मार्गांवर मेट्रोची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे.

हेही वाचा – राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर!

जिल्हा न्यायालय हे मेट्रो स्थानक जमिनीच्या १०८ फूट खाली साकारले असून, हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्थानक आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट (१७ किमी) आणि वनाझ ते रामवाडी (१६ किमी) या दोन मार्गिका आहेत. दोन्ही मार्गिका या स्थानकात एकमेकांना छेदतात. या स्थानकामध्ये पिंपरी महापालिका ते स्वारगेट मार्गिकेवरील भूमिगत स्थानक आणि वनाझ ते रामवाडी या मार्गिकेवरील उन्नत स्थानक आहे.

मेट्रोचे विस्तारित मार्ग

गरवारे महाविद्यालय ते रूबी हॉल स्थानक – अंतर – ५.१२ किमी

स्थानके – गरवारे महाविद्यालय, डेक्कन, छत्रपती संभाजी उद्यान, पुणे महापालिका, जिल्हा न्यायालय. आरटीओ, पुणे रेल्वे स्थानक, रूबी हॉल.

फुगेवाडी ते जिल्हा न्यायालय – अंतर ८ किमी

स्थानके – फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button