breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘वीर सावरकरांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार’; राज्यपाल रमेश बैस

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार असल्याचं वक्तव्य राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी केलं आहे. तसेच येत्या २८ मे रोजी सावकारांची १४० वी जयंती आहे. हा दिवस ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरवदिन’ साजरा करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. त्याच दिवशी देशाच्या नव्या संसदेचं लोकार्पण होणार आहे, असं राज्यपाल रमेश बैस म्हणाले.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात समावेश करणार आहे. तसेच वीर सावरकरांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. सावरकर स्मारकात विद्यार्थी आले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. हे स्मारक देशासाठी प्रेरणास्थान बनायला पाहीजे असे राज्यपाल म्हणाले आहेत.

हेही वाचा – महाविकास आघाडीचा जागावाटप फॉर्म्युला ठरला? यादी पाहाच..

सावरक एक उत्कृष्ट साहित्यिक होते. त्यांनी पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं वर्णन आपल्या पुस्ताकातून अधोरेखित केलं आहे. मधल्या काळात अनेक क्रांतीकारकांबद्दल एक नॅरेटिव्ह तयार केला गेला. या क्रांतिकारकांना बदनाम केलं गेलं. सावरकारांना नाकारणं म्हणजे सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि जवानांचं बलिदान नाकारणं आहे, असं रमेश बैस म्हणाले.

वीर सावरक स्वातंत्र चळवळीतील महान नायक होते. ते विद्वान आणि दार्शनिक होते. दोनदा आजीवान कारावासाची शिक्षा मिळालेले ते एकमेव स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे विचार कालजयी होते. सावरकर म्हणजे तेज, सावरकर म्हणजे त्याग आहे ते सामाजिक विकृतीच्या विरोधात लढणारे योद्धा होते. ते थोर समाज सुधारक होतो. ते जातीवादाच्या विरोधात आहे. जाती या देशासाठी कलंक असल्याचं ते सांगायचे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सावरकरांचे स्वप्न साकारण्यात येणार आहे. राजभवनात वीर सावरकरांवर गॅलरी तयार करण्यात आली आहे, असंही राज्यपाल म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button