TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय!

पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात साजरा केला जणारा गणेशोत्सव यावर्षी आणखी जोमात साजरा होणार आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्य शासनाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी स्पर्धेत पहिल्या क्रमांचे बक्षीस ५ लाख रुपये इतके देण्यात येणार आहे. तसेच, द्वितीय अडीच लाख आणि तृतीय क्रमांसाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गौरव होणार आहे. दि. १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी २४ लाख ६० हजार इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या इमेलवर दि. १० जुलै ते ५ सप्टेंबर २०२३ पूर्वी ऑनलाईन अर्ज करावे. राज्यातील प्रथम तीन मंडळांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख व प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button