पिंपरी / चिंचवड

पतीच्या क्लिनिकमध्ये स्वतःच्या क्लिनिकचे लेबल लावण्यासाठी गेलेल्या पत्नीला मनाई; डॉक्टर पतीसह दिरावर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

पतीच्या क्लिनिकमध्ये पत्नी तिच्या क्लिनिकचे लेबल लावण्यासाठी गेली. त्यावेळी पतीने पत्नीला मनाई केली. तिला मारहाण करून दुखापत केली. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी दोन वजता धावडेवस्ती, भोसरी येथील आनंद क्लिनिक येथे घडली.

डॉ. दत्तात्रय घावटे, अनिल ज्ञानेश्वर घावटे (वय 50, रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पिडीत महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. दत्तात्रय हा फिर्यादी महिलेचा पती आहे. तर आरोपी अनिल हा दीर आहे. फिर्यादी आणि त्यांच्या पतीमध्ये कौटुंबिक वाद आहे. फिर्यादी महिलेने त्याबाबत न्यायालयात केस केली आहे. फिर्यादी व आरोपी हे डॉक्टर प्रक्टिस करत असलेल्या आनंद क्लिनिक येथे त्यांच्या क्लिनिकचे लेबल लावण्यासाठी गेले असता आरोपीने क्लिनिकचे शटर बंद केले. आरोपींनी फिर्यादीस मारहाण करून डोक्यात दुखापत केली. उजव्या हाताला दुखापत केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button