breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर सचिन वाझे यांची विशेष शाखेत बदली

मुंबई – राज्यात मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण प्रचंड गाजत आहे. या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतून त्यांना आता विशेष शाखा १ येथे पाठवण्यात आलं आहे. भाजपाकडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. अखेर वाझे यांची बदली करण्यात आली आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे चर्चेत आलेले गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची बदली करण्यात आली आहे. विशेष शाखा १ येथे यांची बदली करण्यात आली. मनसुख हिरेन प्रकरणात वाझे यांच्यावर आरोप झाल्यानंतर तपास पारदर्शक व्हावा यासाठी बदली करण्यात येईल, अशी माहिती देशमुख यांनी बदलीची घोषणा करताना दिली होती. हिरेन यांचा मृतदेह ५ मार्च रोजी मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला होता. हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला असावा, असा प्राथमिक अंदाज शवचिकित्सा अहवालातून समोर आला होता. त्याआधारे एटीएसने तपास सुरू केला आहे.

वाचा :-मंगलप्रभात लोढा आणि त्यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

कशी आहे वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द…

मुंबई पोलीस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्याप्रकरणातही तपास अधिकारी असलेल्या वाझे यांच्या कथित संबंधांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

१९९०च्या तुकडीतील वाझे यांनी आपली कारकिर्द गडचिरोलीतून सुरू केली. अल्पावधीतच ते ठाण्यातील चकमकफेम अधिकारी ठरले. त्यामुळेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात त्यांचा मार्ग सुकर झाला. परंतु घाटकोपर बॉम्बस्फोटातील संशयित ख्वाजा युनुस याच्या हत्येप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ते पुन्हा पोलीस दलात येण्याची शक्यता मावळली. मात्र जून २०२० मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यांची थेट नियुक्ती विशेष गुन्हे अन्वेषण अधिकारी म्हणून केली गेली. टीआरपी घोटाळा असो वा अमली पदार्थ तस्करी आदी महत्त्वाच्या प्रकरणांचे तेच तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले. रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी आलेल्या रायगड पोलिसांच्या मदतीसाठीही वाझे यांनाच पाठविण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button