breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

महामेट्रोच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांना अनुभव

डॉ. रमेश बन्सल यांचा पुढाकार : मुलांचा वाढदिवसही झाला साजरा

पिंपरी । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

प्रसिद्ध समाजसेवक व वैद्यकीय व्यवसायिक डॉ.रमेश शिवनारायण बन्सल यांच्या पुढाकारातून देहूरोड आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालय क्रमांक दोनच्या 130 विद्यार्थ्यांना महामेट्रोमध्ये प्रवास करण्याचा अनोखा अनुभव आला. महामेट्रोचे ब्रँड अॅम्बेसेडर अमोल देशपांडे यांच्या संकल्पनेतून आणि डॉ. रमेश बन्सल यांच्या प्रेरणेने आयुध निर्माणी येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 चे प्राचार्य सी.पी.प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महामेट्रो सहल आयोजित करण्यात आली होती.

पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन ते फुगेवाडी असा मेट्रो स्टेशनच्या सफरीचा आनंद मुलांनी घेतला. या सहलीचे आयोजन महामेट्रोच्या वतीने महामेट्रोचे डीजीएम मनोज कुमार डॅनियल यांनी केले होते. डॉ.रमेश बन्सल, मुकेश बन्सल, सिद्धार्थ बन्सल, अग्रवाल समाज महासंघाचे उपाध्यक्ष विनोद बन्सल, महामेट्रोचे डीजीएम मनोजकुमार डॅनियल, महामेट्रोचे ब्रँड अॅम्बेसेडर अमोल देशपांडे, केंद्रीय विद्यालय मुख्याध्यापक डॉ. , प्रतिभा तोमर , शिक्षिका दया सोजन , गोविंद सूर्यवंशी, संजीव सैनी, कमला दीनदयाल गुप्ता, उषा गर्ग, मंजू बन्सल, शीला गुप्ता आदी उपस्थित होते.

महामेट्रोचे डीजीएम मनोजकुमार डॅनियल यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. सहा मुलांचा केक कापून त्यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. मनोज कुमार यांनी मुलांना महामेट्रोची सविस्तर माहिती दिली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button