breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमुंबई

विलासराव देशमुख यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येणार?

ग्रामपंचायतीत सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री पार्यतचा प्रवास दाखवणार

मुंबई : अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख सध्या त्यांच्या आगामी वेड या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. रितेश आता अभिनयानंतर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे तर दुसरीकडे जेनेलिया मराठीमध्ये पदार्पन करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच्या एका मुलाखतीदरम्यान रितेशला प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही आता दिग्दर्शनामध्ये पदार्पण केलं आहे. तर वडील विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचा विचार तुम्ही कधी केला आहात का?

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे काही मोजकेच नेते आहेत ज्यांनी आपली सुरवात शून्यातून केली. मात्र आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्वतःचे विश्व निर्माण करत त्यांनी साऱ्यांनाच अवाक करून सोडले. विलासराव देशमुख म्हंटलं की डोळ्यासमोर उभा राहतो हसऱ्या चेहऱ्याचा दिलखुलास व्यक्तिमत्व असलेला, प्रत्येकाला आवडणारा आणि हवाहवासा वाटणार माणूस येतो. याच विलासरावांनी राजकीय जीवनाची सुरवात आपल्या बाभळ गावच्या सरपंच पदापासून करत थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे २ वेळा मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवले. वसंतराव नाईकांनंतर महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुखमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव होते, असंही रितेश म्हणाला.

बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला आहे. ग्रामपंचायतीत सरपंच ते राज्याचे मुख्यमंत्री ही आपण एखाद्या व्यक्तीची कारकिर्द पाहतो. त्या व्यक्तीचा हा जीवनप्रवास खूप मोठा असतो. ४० वर्ष ते राजकीय क्षेत्रात होते. हा संपूर्ण प्रवास दोन तासांमध्ये दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही काय दाखवणार? कुठली गोष्ट दाखवणार? हाही प्रश्न आहे, असंही तो म्हणाला.

माझ्या वडिलांवर चित्रपट करणारच आहे असं काही ठाम नाही किंवा कधीच करणार नाही असंही नाही. तो योग व ती वेळ अजून आली नाही असं मला वाटतं. भविष्यात जर काही यावर काम करता आलं तर पुढे काय घडेल हे आताच सांगता येत नाही.” रितेश विलासराव देशमुख यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार का? हे येणार काळच सांगू शकेल, असं रितेश देशमुख म्हणाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button