breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर, विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

Chhava Teaser | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. यामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

विकी कौशलने हा जबरदस्त टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये, स्वराज्य व धर्माचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज…’छावा’ चित्रपटाचा टीझर नक्की बघा. हा सिनेमा येत्या ६ डिसेंबरला तुमच्या भेटीला येईल, असं म्हटलं आहे. या टीझरमध्ये विकी सर्वांचं लक्ष वेधून घेतो. टीझर संपताना औरंगजेबची झलक पाहायला मिळते. अक्षय खन्ना ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

हेही वाचा   –    Raksha Bandhan | बहिणींनो भावाला राखी बांधताना फक्त ३ गाठी बांधा? जाणून घ्या महत्त्व..

 

दरम्यान, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा बायोपिक चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘छावा’मध्ये अनेक मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळेल. तर, दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका यामध्ये महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button