![Pune News : किल्ले पाहिलेला माणूस! गो.नि. दांडेकर यांच्यावर आधारित चित्रफीत होणार प्रदर्शित - MPCNEWS](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Pune-News-किल्ले-पाहिलेला-माणूस-गोनि-दांडेकर-यांच्यावर-आधारित.jpg)
पुणे :श्याम मालपोटे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने गुढीपाडव्याच्या दिवशी पुण्यातील एस.पी.कॉलेजच्या लेडी रमाबाई रानडे या सभागृहात प्रसिद्ध गिर्यारोहक गो.नि.दांडेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत 2 एप्रिल रोजी (शनिवार) सायंकाळी 5.30 वाजता प्रदर्शित केली जाणार आहे व प्रदर्शन सोहळा पार पडणार आहे.
गो.नि दांडेकर यांच्यावर प्रदर्शित होणाऱ्या चित्रफितीमध्ये त्यांच्या आयुष्यातील दुर्गप्रवासातील घडामोडी आणि त्यांचे दुर्गसंवर्धनाविषयी असलेले विचार माहितीपटाद्वारे दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली.
ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दुर्गभ्रमंती साठी झोकून दिले व दुर्ग हि तीर्थक्षेत्रे मानली असे दुर्गमहर्षी गोपाळ नीलकंठ दांडेकर यांच्या आयुष्यावर आणि विचारावर आधारित माहितीपट पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून गिरीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने हा माहितीपट गिरीप्रेमींना विनामूल्य प्रवेशासहित दाखविला जाणार आहे.