The Kerala Story च्या अभिनेत्री आणि दिग्दर्शकाचा गंभीर अपघात, ट्वीट करत दिली माहिती
![The actress and director of The Kerala Story met with a serious accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/05/the-kerala-story-1-780x470.jpg)
The Kerala Story : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा अपघात झाला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. द केरळा स्टोरी सिनेमाची टीम करीमनगर येथील हिंदू एकता यात्रेत सहभागी होणार होते. यावेळी त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे.
अभिनेत्री अदा शर्माने एक विशेष हेल्थ अपडेट शेअर केली आहे. रात्री ८ वाजता अदा शर्माने संपूर्ण घटना सांगत चाहत्यांना काळजी करण्याचं काही कारण नसल्याचं अदाने सांगितलं आहे. अदा शर्मा म्हणाली की, मी ठीक आहे मित्रांनो, आमच्या अपघाताच्या सततच्या बातम्यांमुळे मला खूप मेसेज येत आहेत. संपूर्ण टीम, आम्ही सर्व ठीक आहोत, काहीही गंभीर नाही, काहीही महत्वाचे नाही परंतु काळजी केल्याबद्दल धन्यवाद.
हेही वाचा – अमोल कोल्हेंच्या त्या आरोपावरून जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा
सुदीप्तो यांनीही सांगितले की, मेडिकल इमरजन्सीमुळे ते यात्रेला उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, आज आम्ही करीमनगरला तरूणांच्या बैठकीत आमच्या चित्रपटाबद्दल बोलायला जाणार होतो. दुर्दैवाने काही आरोग्यविषयक समस्यांमुळे आम्ही प्रवास करू शकलो नाही. करीमनगरवासीयांची मनापासून माफी मागतो. आपल्या मुली वाचाव्या यासाठी आम्ही हा चित्रपट बनवला. कृपया आमच्या #HinduEkthaYatra पाठिंबा देत रहा.