Vijay Thalapathy : थलपथी विजयचे इंस्टाग्रामवर पदार्पण! काही तासांत ४५ लाख फॉलोअर्स
थलपती विजयचे अवघ्या काही तासांत ४५ लाख फॉलोअर्स
![Thalapathy Vijay got 45 lakh followers in just a few hours after entering Instagram](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Vijay-Thalapathy-780x470.jpg)
Vijay Thalapathy : दक्षिणात्या सुपरस्टार थलपती विजयने इंस्टाग्रामवर आपलं अकाऊंट बनवलं आहे. विजयच्या इंस्टाग्राम एन्ट्रीने इंटरनेट विश्वात धुमाकूळ घातला आहे. त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्याने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे.
इंस्टाग्रमवर एन्ट्री करताच थलपती विजयचे अवघ्या काही तासांत ४५ लाख फॉलोअर्स झाले आहेत. थलपती विजयने स्वत:च फोटो शेअर करत नमस्कार मित्रांनो असं कॅप्शन देत एक खास पोस्ट देखील शेअर केली आहे.
थलपती विजय शेवटचा वारिसूमध्ये दिसला होता, त्याने रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Instagram वर पदार्पण केले. प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यानंतर लगेचच, अभिनेत्याचे जवळपास १.५ दशलक्ष फॉलोअर्स झाले, ज्यामुळे तो इंस्टाग्रामवर १ दशलक्षचा टप्पा ओलांडणाऱ्या सर्वात जलद सार्वजनिक व्यक्तींपैकी एक बनला.
अभिनेत्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामील झाल्यानंतर अवघ्या 99 मिनिटांत १ दशलक्ष फॉलोअर्सचा आकडा पार केला आहे. माहिती नुसार, BTS’ V उर्फ किम Taehyung ने ४३ मिनिटांत १ दशलक्ष फॉलोअर्स मिळवले, त्यानंतर अँजेलिना जोली ५९ मिनिटांत.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/image-4-1024x612.png)