राधेच्या ‘दिल दे दिया’चा टीजर प्रदर्शित
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/dil-de-diya-hai.png)
सिटी मार’च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे निर्माते आणखी एक डांस नंबर ‘दिल दे दिया है’ करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीज़र प्रदर्शित करण्यात आला असून गाण्याची एक झलक सादर केली आहे ज्यावरून आपल्याला अंदाज लावता येई कि हे गाणे किती धमाकेदार होणार असेल.
टीज़र जॅकलीनच्या सिल्हूटसोबत सुरु होते त्यानंतर एक भव्य सेट आपल्या नजरेस पडतो. ज्यावर हे गीत चित्रित करण्यात आले आहे. टीज़रमध्ये अभिनेत्रीला एका एथनिक ड्रेसमध्ये दाखवण्यात आले असून तो ती अत्यंत सुंदरपणे कॅरी करताना दिसते आहे. मागील काही वर्षांमध्ये आपण जॅकलीनला अनेक डांस नंबरमध्ये पहिले आहे मात्र, यात ती त्या सगळ्यांहून अनोखी दिसते आहे. गाण्यात आपण सलमान आणि जॅकलीनला लाईव्ह बीट्सवर थिरकताना पाहू शकतो, जे आपल्या परफॉर्मन्सला खूप एन्जॉय करत आहेत. सलमान आणि जॅकलीनची जोड़ी नेहमीच चमकदार राहीली आहे आणि असेच काहीसे ‘दिल दे दिया है’मध्ये बघण्यास मिळत आहे.
गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे मात्र, त्यासाठी तुम्हाला हे गाणे पहावे लागेल.
https://www.instagram.com/p/COPWNdOF_F4/?utm_source=ig_embed&ig_mid=93AE727E-F285-4DD9-ABEB-FE5AB57401F0
त्याचप्रमाणे, जॅकलीनने ज्या डांस स्टेप केल्या आहेत, त्या समजायला खूपच ट्रिकी आहेत, मात्र त्या तिने अत्यंत सहजतेने आणि शानदारपणे निभावल्या असून तिने स्टेज आणि स्क्रीनवर अक्षरश: आग लावली आहे. हे गाणे एका उत्तम चित्रपटामध्ये एक उत्कृष्ट अॅडिशन ठरेल. निश्चित रूपाने, सलमान आणि राधेच्या चाहत्यांसाठी त्यांच्या उत्सुकतेचा हा परमोच्च बिंदू असेल.
हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे.
सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी5 वर ‘पे-पर-व्यू’ सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवीवर देखील उपलब्ध असेल.