breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Sushant Singh Suicide Case: ‘सुशांत सिंह प्रकरणी खरं जगाला जाणून घ्यायचंय’, बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत  आत्महत्या प्रकरणावर आता बॉलिवूडमधूनही सीबीआय चौकशीची मागणी होऊ लागलेली आहे. अभिनेता वरुण धवन आणि सुरज पांचोली यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केलेली आहे. तसेच सुशांतच्या मृत्यूविषयीचं खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सुशांतला न्याय मिळायला हवाय, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे.

सुरज पांचोलीने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये खरं जगाला जाणून घ्यायचं आहे. सूशांतला न्याय मिळायला हवं, असं मत व्यक्त केलं आहे. तर वरुण धवनने आपल्या इन्स्टा स्टोरीमध्ये #cbiforsushant असा हॅशटॅग वापरत सीबीआय चौकशीला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अनेकदा #justiceforsushantsingrajput हा हॅशटॅग ट्रेंड करतो आहे. यात बॉलिवूडमधील अनेक मोठी नावंही व्यक्त होत आहेत. अभिनेत्री परिणीती चोप्राने देखील इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून सत्य बाहेर यायला हवं आहे. सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळायला हवा, असं म्हटलेलं आहे. यावेळी तिने #JusticeForSSR असा हॅशटॅग वापरलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button