ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई
सुशांतच्या घरात राहताना अदा शर्माला भितीदायक अनुभवाबद्दल विचारतात
सुशांतनंतर आता त्याचा फ्लॅट प्रसिद्ध अभिनेत्री अदा शर्माने भाड्यावर घेतला
![Sushant, Ghar, Adah Sharma, Bhiti, Sadik, Experience, Flat, Famous,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/ada-sharma-780x470.jpg)
मुंबई : 2020 साली अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. तेव्हापासून जवळपास चार वर्ष त्याचा फ्लॅट रिकामी आहे. कोणीही त्या फ्लॅटमध्ये जायला तयार होत नव्हतं.काही काळापूर्वी अभिनेत्री अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतच्या त्या घरामध्ये रहायला सुरुवात केली. सुशांतचा फ्लॅट तिने भाड्यावर घेतला आहे. त्यासाठी तिला ट्रोलही करण्यात आलं.
लोक काय बोलतात याने मला फरक पडत नाही. मी माझ्या निर्णयावर खुश आहे असं अदा शर्माने नुकतच एका मुलाखतीत सांगितलं. सुशांतच्या घरात मी सेटल झाली असून मला ते घर आवडलय. फिल्मीग्यान सोबत मुलाखतीत तिने अजूनही काही खुलासे केलेत.
तुला त्या घरात राहताना सुशांतच अस्तित्व कधी जाणवलं का? त्यावर अदाने ‘हो’ असं उत्तर दिलं. लोक अनेकदा मला भितीदायक अनुभवाबद्दल विचारतात. माझ्या मते भितीबद्दल प्रश्न विचारणं चुकीच आहे.