सूरज हा एकमेव स्वत:चं घर म्हणून सफाई करतो- रितेश देशमुख
बिग बॉसच्या इतिहासात एकच स्पर्धक आसा ज्याने घराला आपलं घर मानलं तो सूरज चव्हाण
![Suraj, House, Cleanliness, Riteish Deshmukh, Bigg Boss, contestants,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/suraj-780x470.jpg)
मुंबई : बिग बॉस मराठी सीझन 5 सुरू असून आता रंगत वाढू लागली आहे. बिग बॉसच्या घरात आता हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि निक्की तांबोळी यांच्यातील उडणार खटके, त्यानंतर वैभव आणि इरिना यांची केमिस्ट्री तर कोकण हार्टेड गर्ल अंकिता कॅप्टन झाली आहे. यंदाचा आठवडा जान्हवीने गाजवला खरा पण तिने खालच्या स्तराला जात भाषा वापरल्याने चाहते तिच्यावर नाराज आहेत. रितेशने शनिवारी भाऊच्या धक्क्यावर तिला चांगलंच झापलं. यावेळी इन्स्टा रील स्टार सूरज चव्हाण याचा मला अभिमान असल्याचं रितेश म्हणाला. नेमकं असं का म्हणाला जाणून घ्या.
सूरज हा एकमेव स्वत:चं घर म्हणून सफाई करतो- रितेश देशमुख
किचनमधील काम म्हणजे जबाबदारी जास्त आणि सर्वात कमी लेखलं जाणारे काम म्हणजे साफ-सफाई. काही लोक करतात पण त्यातही मोठेपणा दाखवतात पण बिग बॉसच्या इतिहास सूरज हा एकमेव आहेत, ज्यांनी या कामाला कमी लेखलं नाही. सगळे ड्युटूी म्हणून साफ करतात. मला हे सांगायला अभिमान वाटतो की सूरज चव्हाण हे स्वत: चं घर म्हणून साफ करतात. बिग बॉसच्या इतिहासात एकच स्पर्धक असेल ज्याने या घराला आपलं घर मानलं तो सूरज चव्हाण आहे.
आपण घरातील धूळ कचरा बाहेर काढतो ना तेव्हा घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते. या घरातील निगेटीव्हिटीमध्ये तुम्ही एकमेक पॉझिटिव्ह गोष्ट आहात. मला कळतंय तुम्हाला टास्क कळायला वेळ लागतो. जास्त समजत नाही, दडपण येतं आणि विचार करता. पण तुम्ही भिऊ नका, भिडा बिंधास्त नडा, असा सल्लाही रितेश देशमुखने सूरजला दिला.
तुमच्यात ते तेज दिसलं, टास्कमध्ये तुम्हाला एकजण बोलला की एक बुक्कीत तुझं मुंडकं छाटील, पण तुम्ही माघार घेतली नाहीत. याला बोलतात हिंमत. हा दिवस झाले आता कोणाला फरक पडत नाही. तुम्ही तुमचं मत मांडा, इतर लोक ऐकत नसतील पण महाराष्ट्र ऐकत असल्याचं रितेशने सूरज चव्हाणला सांगितलं.
दरम्यान, बिग बॉस घरातून या आठवड्यात कोण बाहेर जाणार हे भाऊच्या धक्क्यावर रितेश देषशमुख सांगणार आहे. या आठवड्यामध्येस दुसरा स्पर्धक बाहेर पडणार आहे. त्यामुळे भाऊच्या धक्क्यावर कोणाला धक्का बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.