प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन
मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास
मुंबई : बॉलिवूडच्या चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांचे वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (गुरुवार) त्यांनी मुंबईतील नानावटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून खूप आजारी होत्या. तसेच त्या गेल्या 16 वर्षांपासून अंथरुणावर होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्यांच्या कारकीर्दीबाबत माहिती जाणून घेऊयात.
प्रेक्षकांच्या मनावर केले राज्य
प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका सुलक्षणा पंडित यांनी 70 आणि 80 च्या दशकात आपल्या मधुर आवाजाने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भूरळ घातली होती. सुलक्षणा पंडित यांचा जन्म 1954 मध्ये एका प्रतिष्ठित संगीत कुटुंबात झाला होती. त्या दिग्गज शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या भाची होत्या. सुलक्षणा यांचे बंधू जतिन-ललित ही प्रसिद्ध संगीतकार जोडी होती.
वयाच्या नवव्या वर्षांपासून गायनाला सुरुवात
सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. 1967 साली त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. संकल्प चित्रपटातील “तू ही सागर है तू ही किनारा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा – पार्थ पवारांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; सखोल चौकशी करण्याचे आदेश
प्रसिद्ध चित्रपटांमध्ये केले काम
गायनासोबत सुलक्षणा पंडित यांनी अभिनय श्रेत्रातही महत्त्वाचे योगदान दिले. त्यांनी अभिनेता संजीव कुमार यांच्यासोबत उलझन आणि संकोच या चित्रपटांमध्ये काम केले. सुलक्षणा यांची बॉलिवूड कारकीर्द संगीत आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात विस्तारलेली होती. कारकीर्दीत मिळालेल्या यशानंतरही त्यांचे वैयक्तिक जीवनात मोठी आव्हाने होती. कारण त्यांनी लग्न केले नाही.
लग्न केले नाही
संपूर्ण आयुष्यभर त्या एकट्या होत्या. सुलक्षणा यांचे संजीव कुमारसोबत अफेअर होत, मात्र ही प्रेमकथा अधुरीच राहीली, त्यामुळे त्यांच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला. बॉलिवूडमधून बाहेर पडल्यानंतर सुलक्षणा यांना विविध आजारांनी ग्रासले, तसेच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. सुलक्षणा यांच्या निधनाने चित्रपट आणि संगीत क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.




