breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘शेरशाह’साठी सिद्धार्थ-कियाराला मिळालं तगडं मानधन

‘शेरशाह’  या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर ‘शेरशाह’ हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटात विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीदेखील दाखवण्यात आली आहे. विष्णू वर्धन दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून कियारा अडवाणी ही त्यांची गर्लफ्रेंड डिंपल छिमाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी सिद्धार्थने तगडं मानधन स्वीकारलं आहे. ‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, विक्रम बत्रा यांची भूमिका साकारण्यासाठी सिद्धार्थने तब्बल सात कोटी रुपये स्वीकारले आहेत. इतर कलाकारांच्या तुलनेत सिद्धार्थला सर्वाधिक मानधन मिळालं आहे.

कियाराने बॉलिवूडमध्ये अल्पावधीच स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘शेरशाह’ चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचं प्रेक्षक-समिक्षकांकडून कौतुक झालं. डिंपलच्या भूमिकेसाठी कियाराला चार कोटी रुपये मिळाले. याआधी कियाराने ‘एम. एस. धोनी’, ‘कबीर सिंग’, ‘लस्ट स्टोरीज’, ‘गिल्टी’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ यांसारख्या चित्रपट आणि वेब सीरिजमधून अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

चित्रपटात अजय सिंगची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता निकेतन धीरला ३५ लाख रुपये मानधन मिळालं. अभिनेता पवन कल्याण यांनी ‘शेरशाह’मध्ये विक्रम बत्रा यांच्या वडिलांची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांना ५० लाख रुपये मिळाले. अभिनेता शिव पंडितने लेफ्टनंट संजीव जिमी जामवालची भूमिका साकारली. त्यासाठी त्याने ४५ लाख रुपये मानधन मिळालं. विक्रम बत्रा यांचे खास मित्र सुभेदार बन्सी लाल यांची भूमिका अभिनेता अनिल चरनजीतने साकारली. यासाठी त्याला २५ लाख रुपये मिळाले. हैदरची भूमिका साकारणाऱ्या मीर सरवारला २५ लाख रुपये मानधन मिळाले.करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने शेरशाह या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १२ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून देशभरातून त्याला दमदार प्रतिसाद मिळाला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button