धक्कादायक! अभिनेत्री पूनम पांडे यांचे निधन
Poonam Pandey : अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने लोकांना धक्का बसला आहे. काही वेळापूर्वी अभिनेत्रीचे निधन झाल्याचे समोर आले होते. वयाच्या ३२ व्या वर्षी पूनम पांडेने जगाचा निरोप घेतला आहे. मृत्यूचे कारणही समोर आले आहे. अभिनेत्री पूनम पांडे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवासी असून या दुःखद घटनेवेळी पूनम पांडे तिच्या घरी उपस्थित होती. कानपूर, यूपी येथेच त्यांचा मृत्यू झाला.
मॉडेल-अभिनेत्री इंटरनेट सेन्सेशन आणि सर्वात वादग्रस्त स्टार पूनम पांडे यांचे कर्करोगाने निधन झाले. शुक्रवारी सकाळी इंस्टाग्रामवर एका पोस्टने या बातमीची पुष्टी केली. अभिनेत्रीच्या टीमने पोस्ट केले, ‘आजची सकाळ आमच्यासाठी कठीण आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनम पांडे त्यांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा – मराठा आरक्षण सर्वेक्षणाला मुदतवाढ नाही; राज्य शासनाची मोठी भूमिका
या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले आहे की, ‘या दु:खाच्या काळात आम्ही गोपनीयतेची विनंती करू आणि आम्ही सर्व सामायिक केलेल्या सर्व गोष्टींसाठी आम्ही त्यांची आठवण ठेवतो.’ या पोस्टवरून अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.