अश्लील चित्रपटप्रकरणी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मिळाला दिलासा
![Shilpa Shetty's husband Raj Kundra got relief in the pornographic film case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Shilpa-Shetty-780x470.png)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अश्लील चित्रपट बनवून ती ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाने राज कुंद्रा, अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पुनम पांडे आणि उमेश कवत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
राज कुंद्रा विरुद्धा 1 हजार पानांचे आरोपत्र दाखल
मागील महिन्यात मुंबई सायबर क्राईमने राज कुंद्रासह सर्व आरोपींविरुद्ध 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांचा दावा आहे की, राज कुंद्राने अश्लील चित्रपट शूट केले आणि ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केले. दुसरीकडे, कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी दावा केला आहे की कोणत्याही प्रकारचे साहित्य किंवा बेकायदेशीर व्हिडिओ प्रसारित करण्यात त्यांचा सहभाग नव्हता.
2019 मध्ये झाला होता गुन्हा दाखल
सायबर पोलिसांनी राज कुंद्रा विरोधात 2019 मध्ये तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की, दिग्दर्शक राज कुंद्रा काही वेबसाइट्ससाठी अश्लील चित्रपट तयार करुन त्याचे वितरण करण्यात गुंतला होता.
सप्टेंबर 2021 मध्ये मिळाला जामीन
मुंबई सायबर क्राईमद्वारे हाय-प्रोफाईल प्रकरण उघडकीस आल्यानंतर सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळण्यापूर्वी राज कुंद्राला 2 महिन्यांच्या कोठडीत पाठवले होते.