शनाया करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; करण जोहर पुन्हा ट्रोल
![Shanaya to make Bollywood debut; Karan Johar trolls again](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Karan-Johar-and-Shanaya-Kapoor-.jpg)
मुंबई – बॉलिवूड निर्माता करण जोहर याने आजपर्यंत बॉलिवूडमधील अनेक स्टारकिड्सला लॉन्च केले आहे. आता तो आणखी एक स्टार किड पडद्यावर घेऊन येणार आहे. ही स्टार किड आहे अभिनेता संजय कपूर याची मुलगी शनाया कपूर आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून करणने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, यानिमित्ताने आता तो पुन्हा एकदा ट्रोल होत असून सोशल मीडियावर घराणेशाहीचा वाद पेटला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या अत्महत्येनंतर बॉलिवूडमधील गटबाजी आणि घराणेशाहीमुळे सिनेजगतातील कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. त्यानंतर आता शनायाच्या निमित्ताने करणला नेटकरी ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर करणला ‘नेपोटिझमचा देवता’ अशी उपाधी दिली आहे.
यापूर्वी करणने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे या स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये लाँच केले आहे. आता तो शनायाला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणार आहे. शनाया Dharma Cornerstone Agencyसोबत काम करणार आहे. करण जोहरने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. शिवाय करणने शनायाचे काही फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.