ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर रंगभूमीवर पुन्हा सक्रीय, पत्रापत्री’ या नाटकाची सध्या चर्चा

दिलीप प्रभावळकर इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच करणार अनोखा प्रयोग

मुंबई : लेखन आणि अभिनयात वेगवेगळे प्रयोग करण्याला प्राधान्य देणारे अष्टपैलू रंगकर्मी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्या ‘पत्रापत्री’ या नाटकाची सध्या चर्चा आहे. अभिवाचनाचा अनोखा प्रयोग असलेल्या ‘पत्रापत्री’चा प्रयोग येत्या ९ नोव्हेंबर रोजी रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सायंकाळी ७ वाजता होणार आहे. विशेष म्हणजे यानिमित्तानं अभिनेते दिलीप प्रभावळकर पहिल्यांदाच रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादरीकरण करणार आहेत.

या प्रयोगाबद्दल स्वत: उत्सुक असणारे प्रभावळकर म्हणाले, ‘आतापर्यंत ‘पत्रापत्री’चे २५ प्रयोग झाले असून ९ नोव्हेंबरला ऑपेरा हाऊसला होणाऱ्या प्रयोगासाठी मी फार उत्सुक आहे. कारण मी यापूर्वी कधीच तिथे प्रयोग केले नाहीत. त्या वास्तुला एक ऐतिहासिक महत्त्व तर आहेच; शिवाय एक परंपराही आहे. त्यामुळेच त्या दिवसाचा प्रयोग मला खूप समाधान देऊन जाईल हे निश्चित आहे.’ बदाम राजा प्रोडक्शन्स निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘पत्रापत्री’मध्ये एकूण पाच पत्रांचे अभिवाचन आहे. प्रत्येक पत्राला एक कथा आहे. यात तात्यासाहेब आणि माधवराव या व्यक्तिरेखा असून अनुक्रमे दिलीप प्रभावळकर, विजय केंकरे पत्रांचं अभिवाचन करतात.

आतापर्यंत १०० हून अधिक नाटकांचं दिग्दर्शन केलेल्या विजय केंकरे यांच्यासाठी पत्रापत्री खास आहे. याचं कारण म्हणजे, प्रभावळकरांच्या ‘पत्रापत्री’ पुस्तकाला साहित्य संमेलनाचा पुरस्कार मिळाला. सोलापुरात झालेल्या कार्यक्रमावेळी केंकरेही तिथे उपस्थित होते. तेव्हा पहिल्यांदा दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनातून त्यांनी ‘पत्रापत्री’ पुस्तक वाचलं आणि यावर एक रंजक अभिवाचनाचा प्रयोग होऊ शकतो हे त्यांच्या डोक्यात आलं आणि त्यानंतर हे नाटक रंगभूमीवर आलं. रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये काही मराठी नाटकांचे प्रयोग झाले असून, त्यांना नाट्यरसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यात आता ‘पत्रापत्री’ची भर पडणार आहे.

पत्रापत्रीच्या लेखनाबद्दल बोलताना प्रभावळकर म्हणाले की, मी जेव्हा माधवराव आणि तात्यासाहेब यांची पत्रं लिहीत होतो तेव्हा मी माधवराव आणि तात्यासाहेब होऊन लिहित होतो. त्यामुळे त्यात लेखक आणि नट दोघंहा डोकावतात. ही पत्रापत्रीची जमेची बाजू आहे. मला नेहमी वाटतं की संगीताचा जसा कान असतो तशीच विनोद किंवा व्यंग टिपण्याची एक दृष्टी असते. याचा वापर मी या अभिवाचन दृक आविष्कारामध्ये पाहायला मिळतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button