ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर नुकताच प्रदर्शित

शरद केळकरला या रुपात पाहणं प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच 

मुंबई : शरद केळकर म्हटलं की बाहुबलीचा भारदस्त आवाज आपल्याला आठवतो. पण एका चित्रपटामधून शरद केळकर खरोखरच बाहुबलीसारख्याच दमदार आणि भारदस्त भूमिकेत दिसणार आहे. तो चित्रपट आहे ‘रानटी’. समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ चित्रपटाचा धमाकेदार टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिझर पाहिल्यानंतर चर्चा होतेय ती शरद केळकरच्या लूक आणि स्टाईलची. ज्या पद्धतीने शरदचा रौद्र अवतार या टिझरमध्ये पाहायला मिळाला. त्याचा हा असा ‘रानटी’ अवतार पाहून पेक्षकांनाही तो अंगावर येणारा वाटला आहे.

जबरदस्त अ‍ॅक्शन अन् दमदार डायलॉग

अभिनेता शरद केळकर याच्यासह संतोष जुवेकर, संजय नार्वेकर असे अनेक दमदार कलाकारही चित्रपटात पाहायला मिळत आहेत. पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा मराठीतला सगळ्यात मोठा अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे. टिझरमध्येही फक्त अॅक्शन आणि अॅक्शनच पाहायला मिळतेय. टिझरमध्ये शरदचे डायलॉग ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहेत ते चाहत्यांना नक्कीच भावले आहेत.

‘अपून फूल ऑन डेंजर.. डोन्ट टेक मी लाइट’, मी तर तुफान आहे , म्हणून मी हिंसक झालोय अशा दमदार डायलॉग टिझरमध्ये पाहायला मिळत आहेत. ‘विष्णू’ हा बेरकी आणि कपटी व्हिलनला स्वतःच्या शक्ती आणि युक्तीने अद्दल घडवताना दिसणार आहे. अ‍ॅक्शनच्या जोडीला इमोशन आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा एक ड्रामाही कथेत पाहायला मिळणार आहे. ‘रानटी’ येत्या 22 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. जॅकी श्रॉफ आणि संजय दत्त यांनीसुद्धा दिग्दर्शिक सुमित कक्कडच्या ‘रानटी’ चित्रपटाच्या दमदार टिझरची झलक सोशल मीडियामध्ये शेअर केली आहे.

मराठीतील भव्य अ‍ॅक्शनपट

समित ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने मराठीत भव्य अ‍ॅक्शनपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून त्यातील वेगळेपणा आणि भव्यता दिसून अली आहे. ‘रानटी’चा टिझर पाहताना सर्वांच्याच अंगावर अक्षरशः काटे येतात. हा टिझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. मुख्य म्हणजे शरद केळकरला या रुपात पाहणं , अॅक्शन करताना पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असणार आहे.

प्रेक्षकांचे टिझरला भरभरून प्रेम

‘रानटी’ चित्रपटाच्या टिझरला नक्कीच कलाकारांसह चाहत्यांचीही पसंती आणि भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. टिझरवर चाहत्यांनी भरभरून कमेंट करच चित्रपट पाहण्याची उत्सुकता असल्याचे सांगितले आहे. हृषिकेश कोळी यांनी लिखाण केलं आहे तर, अजित परब यांनी संगीत दिलं आहे. तसेच अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत आहे आणि सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण. चित्रपटाच्या टिझरवरून चित्रपटाची तांत्रिक बाजू किती भक्कम आहे हे नक्कीच दिसून येत.22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button