‘आदिपुरूष’ मधील संवादांवर संतापले रामायणचे लक्ष्मण
Adipurush : आदिपुरूष सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. VFX व इतर वादांमुळे दोनदा टीझर व ट्रेलरमध्ये बदल करण्यात आले. मात्र तरीही प्रेक्षकांची निराशा झाल्याचं स्पष्ट झाले आहे. चित्रपटातील हनुमानाचे संवादावरूनही नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान यावरून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतील लक्ष्मण म्हणजेच सुनील लहरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुनील लहरी यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये चित्रपटातील हनुमान आणि रावणाचे काही संवाद लिहिलेला दिसत आहे. आदिपुरूष हा चित्रपट रामायण समोर ठेवून बनवण्यात आला आहे. असं म्हटलं जात आहे, जर ते खरं असेल तर अशी भाषा वापरणे अत्यंत लाजिरवाणे आहे, असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा – व्हॉट्सॲप आणणार ‘हे’ भन्नाट फिचर, युजर्स होणार समाधानी!
दरम्यान, आदिपुरूष सिनेमाने पहिल्या दिवशी चांगलीच कमाई केली आहे. या सिनेमाने जगभरात तब्बल १४० कोटी रूपयांची कमाई केली आहे. तसेच वीकेंडवा प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.