राहुल द्रविडचा मुलगा समित याचे टी २० स्पर्धेत पदार्पण
१५ ऑगस्टच्या निमित्ताने या लीगची सुरुवात, समितच्या किती धावा
![Rahul Dravid, Samit, T20, Tournament, Debut, August 15, League, Samit, Runs,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/samit-780x470.jpg)
नवी दिल्ली : राहुल द्रविड यांनी भारताला टी २० वर्ल्ड कप जिंकवून दिला. त्यानंतर आता राहुल द्रविड यांचा मुलगा समित याने ची २० स्पर्धेत पदार्पण केल्याचे समोर आले आहे. समित याने आपल्या पहिल्याच सामन्या किती धावा केल्या, याची उत्सुकता चाहत्यांना होती आणि ती माहिती आता समोर आली आहे.
समितने यापूर्वीही स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. काही वेळ तर राहुल द्रविडही त्याचा सामना पाहायला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. समितने एकामागून एक यशाच्या शिड्या चढत आता तो टी २० स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे. वडिलांनी भारताच्या टी २० संघाला वर्ल्ड कप जिंकवून दिला आणि आता मुलगा यापुढे टी २० क्रिकेट खेळताना दिसणार आहे.
समितने कोणत्या टी २० स्पर्धत पदार्पण केले….
बंगळरुतील एम ए चिदंबरम स्टेडियमध्ये कर्नाटकमधील महाराज टी २० लीगला सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्स संघाकडून समितने पदार्पण केले. यावेळी भारतीय संघाकडून त्रिशतक झळकावणारा करुण नायर हा या संघाचा कर्णधार होता. १५ ऑगस्टला या लीगची सुरुवात करण्यात आली आहे.
समित द्रविडची कशी झाली कामगिरी…
या लीगमध्ये समितला प्रथमच मैदानात उतरण्याची संधी मिळाली. त्यामुळे निश्चितच त्याच्यावर दडपण होते. समित या सामन्यात चौथ्या स्थानावर फलंदाजीला आला होता. समित यावेळी एका डावखुऱ्या गोलंदाजाला मोठा फटका मारताना बाद झाला. समितने यावेळी एका चौकाराऱ्या जोरावर सात धावांची खेळी साकारली. पहिल्या सामन्यात समितला जास्त धावा करता आल्या नाहीत. पण यशाची पहिली पायरी ही अपयश असते, असे म्हटले जाते. त्यामुळे आता समित यापुढे संधी मिळाल्यावर कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
समितने यापूर्वी दमदार कामगिरी करत सर्वांची मनं जिंकली आहेत. या टी २० स्पर्धेतील पहिल्या सामन्यात त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. पण यापुढेही चाहत्यांचे त्याच्यावर लक्ष असेल.