breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

Article 370 | यामी गौतमच्या ‘आर्टिकल ३७०’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Article 370 Trailer | काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आलं होतं. यावर भाष्य करणारा ‘आर्टिकल ३७०’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात यामी गौतम, प्रियामणी, अरुण गोविल हे प्रमुख भूमिकेत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये काश्मिरमध्ये घडणाऱ्या घटनांची झलक दिसते.

‘आर्टिकल ३७०’ या सिनेमात ‘३७० कलम’ हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सगळ्यावर या चित्रपटातून भाष्य केलं असल्याचं ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. या चित्रपटात यामी एका दमदार एनआयए ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत चक्क रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल हे आहेत.

हेही वाचा     –    U19 World Cup Final | ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्याची संधी, भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकप फायनल

चित्रपटाचं दिग्दर्शन सुहास जांभळे यांनी केले असून यामीचा पती आदित्य धर यानेच लोकेश धरसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा २३ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आर्टिकल या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. यामीचा पती आदित्य धर यानेच लोकेश धरसह या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button