पोलिसांना सैफच्या घरातून आणखी एक धक्कादायक गोष्ट आढळली
मुख्य आरोपीला अटक ,हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
![police, saif, house, shock, thing, main, accused, arrest, investigation,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/saif-ali-khan-2-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. याप्रकरणी पोलिसांना सैफच्या घरातून आणखी एक धक्कादायक गोष्ट आढळली आहे. पोलिसांना सैफच्या घरातून आणखी एक चाकूचा तुकडा आढळला असल्याची माहिती समोर येत आहे. शनिवारी रात्री एका अधिकाऱ्याने संबंधित माहिती दिली आहे. सध्या सर्वत्र सैफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, सैफ अली खान 12 व्या मजल्यावर राहतो. घरी कुटुंबासोबत असताना एका अज्ञात व्यक्ती सैफच्या घरात घुसला. त्यानंतर झालेल्या हणामारीमध्ये अभिनेता गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोराने सैफवर सहा वार केला. तेव्हा चाकूचा एक टोक सैफच्या मणक्यात घुसला. शस्त्रक्रिया करून सैफच्या मणक्यात घुसलेल्या 2.5 इंचाचा तुकडा काढण्यात आला आहे. आता सैफची प्रकृती स्थिर असून लवकरच अभिनेत्याला डिस्चार्ज मिळेल.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत. आरपीएने शनिवारी एका संशयीत आरोपीला छत्तीसगडच्या दुर्ग रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतलं आहे. एवढंच नाही तर, पोलिसांनी याप्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवले आहेत.
मुख्य आरोपीला अटक
अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत ठाणे परिसरातून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साइटजवळील लेबर कॅम्पमध्ये संयुक्त कारवाई करून आरोपींना अटक करण्यात आली. विजय दासने यापूर्वी मुंबईतील एका पबमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजयला अटक केल्यानंतर आज पोलीस त्याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर करणार आहेत.
जबाबात काय म्हणाली करीना?
जबाबात करीना म्हणाली, हल्लेखोरापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही संपूर्ण खान कुटुंब 12 व्या मजल्यावर पोहोचलो…’ हल्लेखोराने 11 व्या मजल्यावर हल्ला केला. घरात दागिने समोरच ठेवलेले होते. पण हल्लेखोराने दागिन्यांना हात देखील लावला नाही…’ असं अभिनेत्री म्हणाली. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.