‘पठाण’ सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल १०० कोटी
![Pathan movie earned 100 crores on the first day](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/pathan--780x470.jpg)
मुंबई : शाहरूख खानचा पठाण चित्रपट काल संपुर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या सिनेमाने पहिल्याच दिवशी पठाण ने सगळ्याचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. पठाण ने पहल्याच दिवशी जगभरातुन तब्बल १०० कोटींची कमाई केली आहे. जगभरातुन पठाणला तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच किंग खानच्या पठाण सिनेमाने पहिल्याच दिवशी १०० कोटी क्लब मध्ये दाखल झाला आहे.
सिद्धार्थ आनंद यांनी पठाण सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमातुन शाहरूख खानने ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर आला आहे. या चित्रपटाने भारतात ५७ कोटींची कमाई केली आहे. हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाात मुख्य भुमिकेत शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे अभिनेते आहेत.
पठाण चित्रपट पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करत आहेत. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी आहे. सोबतच शनिवार आणि रविवारी पठाण सिनेमा मोठा विक्रम करू शकतो, असं बोललं जात आहे.
पठाण सिनेमात शाहरूख खान दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम महत्वाच्या भूमिकेत आहे. याशिवाय सलमानचा खानचा कॅमिओ आहे.