निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांमागील सत्य
दोघांनी 'दसवी' या चित्रपटात एकत्र काम,बच्चन कुटुंबीयांवर परिणाम
![Nimrat,Sabat,Abhishek,Affair,Discussion,Satya,Dasavi,Film,Work,Bachchan,Family,Result,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/abhishek-bacchan-780x470.jpg)
मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आहेत. या चर्चांवर अद्याप अभिषेक किंवा ऐश्वर्याने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. मात्र अभिषेकचं नाव आता अभिनेत्री निम्रत कौरशी जोडलं जातंय. या दोघांनी ‘दसवी’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. आता बच्चन कुटुंबाच्या एका जवळच्या व्यक्तीने या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व गोष्टींचा बच्चन कुटुंबीयांवर काय परिणाम होतोय, याविषयी त्याने सांगितलं आहे. बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने मुलाखत दिली असून त्यात त्याने निम्रतसोबत अभिषेकच्या अफेअरच्या चर्चांमागील सत्य सांगितलं आहे. निम्रत आणि अभिषेकच्या नात्याच्या चर्चांमध्ये काही तथ्य नसल्याचं त्याने स्पष्ट केलंय.
अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा सामना करत असल्याने त्याने कोणत्याही वादात अडकू नये असा सल्ला त्याला देण्यात आला आहे. म्हणूनच तो निम्रत प्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीये.या अफवांमध्ये कणभरही तथ्य नाही. आम्हाला आश्चर्य वाटतंय की त्या महिलेनं अद्याप या चर्चांना नाकारलं का नाही? अभिषेक मौन बाळगून आहे कारण त्याच्या खासगी आयुष्यात आधीच खूप समस्या आहेत. त्याला कोणत्याही नव्या वादात न अडकण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असं ती व्यक्ती म्हणाली.
बच्चन कुटुंबाच्या या जवळच्या व्यक्तीने असंही म्हटलंय की अभिषेक त्याच्या पत्नीची फसवणूक कधीच करणार नाही. अभिषेक त्याच्या नात्यात नेहमीच प्रामाणिक आहे .