breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘मुनावर फारुकी’ ठरला बिग बॉसचा महाविजेता! मिळाले तब्बल इतके लाख रुपये

Bigg Boss 17 | ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, मुनव्वर फारुकी, अभिषेक कुमार आणि अरुण माशेट्टी या पाच जणांमध्ये अंतिम चुरस रंगली होती. यामध्ये स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ‘बिग बॉस १७’च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वर फारुकीला बक्षीस म्हणून ट्रॉफी, ५० लाख रुपये आणि ह्युंडाई क्रेटा ही कार मिळाली आहे. मुनव्वर हा बिग बॉस या शोमध्ये सुरुवातीपासूनच लोकप्रिय स्पर्धक ठरला होता. मुनव्वर सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असणारा सेलिब्रेटी आहे. इंस्टावर त्याला १० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा   –    मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाला महत्वाचं आवाहन; म्हणाले…

मुनव्वर फारुकी आहे तरी कोण?

मुनव्वर हा एक प्रसिद्ध कॉमेडियन व लोकप्रिय रॅपर म्हणून ओळखला जातो. त्याच्या अनेक कविता, किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस’च्या आधी मुनव्वरने ‘लॉकअप’च्या पहिल्या सीझनच्या विजेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हापासून तो घराघरांत लोकप्रिय झाला होता.

मुनव्वरचा जन्म २८ जानेवारी १९९२ रोजी गुजरातमधील जुनागडमध्ये झाला. कौटुंबिक समस्या व वडिलांचं आजारपण यामुळे त्याला बालपणापासून काम करावं लागलं होतं. आईच्या निधनानंतर तो मुंबईला आला. २०२० मध्ये मुनव्वरच्या वडिलांचं निधन झालं. दरम्यान, ‘दाऊद, यमराज औरत’ या म्युजिक व्हिडीओमुळे त्याला करिअरमध्ये खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. तसेच मुनव्वरने नुकतंच २० स्पर्धांवर मात करत बिग बॉसच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button