एमएस धोनीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण? करण जोहर यांनी शेअर केला व्हिडिओ

Mahendrasingh Dhoni : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार क्रिकेटपटू एमएस धोनी एका नव्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. धोनीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरच्या आगामी प्रोजेक्टमध्ये एमएस धोनी’लव्हर बॉय’ची भूमिका साकारणार आहे.
याची हटके झलक करणने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली आहे. यातून धोनीचा एक नवीन लूक आणि अवतार समोर येणार आहे. करणने शेअर केलेल्या व्हिडीओत क्रिकेटपटू एमएस धोनी रोमँटिक अंदाजात दिसत आहे.
व्हिडीओच्या सुरूवातीलाच ‘पहिल्यांदाच एमएस धोनी रोमँटिक अवतारात’ असे लिहिलेले पाहायला मिळत आहे. तो म्हणतो की, “तू सोबत असतेस तेव्हा प्रत्येक प्रवास सुंदर बनतो.” व्हिडीओमध्ये धोनीच्या हातात हार्टच्या आकाराचा फुगा पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – सोन्याचा चमचा अन् पानाला चुना: गुलाबराव पाटील रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक, नेमकं काय म्हणाले?
या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. चाहते धोनीला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. दरम्यान, एमएस धोनी करण जोहरच्या नवीन जाहिरातील दिसणार आहे. याची एक झलक करणने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. याआधी देखील धोनीने अनेक जाहिरातीमध्ये काम केले आहे. मात्र ही जाहिरात खास असणार आहे.
कारण यात धोनीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. एमएस धोनीचा हा व्हिडिओ म्हणजे एका कंपनीची जाहिरात आहे. ही व्हिडिओ क्लिप बॉलीवूड चित्रपटातील वाटत असल्याने धोनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार अशी चर्चा चाहत्यांमध्ये आहे.
यापूर्वी धोनीने करण जोहरसोबत एका बाईक जाहिरातीसाठी काम केलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित एमोटोराड इलेक्ट्रिक सायकल जाहिरातीत धोनीचा हटके लूक बघून सगळेच आश्चर्यचकित झाले होते.