एमसी स्टॅनचे धक्कादायक विधान; म्हणाला,..मला जीवे मारण्याच्या प्रयत्न केला
![MC Stan said they tried to kill me](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/mc-stan-1-780x470.jpg)
तीन-चार वेळा ते मला मारण्यासाठी धावले
MC Stan : बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर यामुळे स्टॅनचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण आता त्याने एका मुलाखतीती आपल्याला मारून टाकण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचं धक्कादायक विधान केलं आहे.
एमसी स्टॅन नुकताच द रणवीर शो या यूट्यूब चॅनलला एक मुलाखती दिली. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. लहानपणापासून त्याची झालेली जडण घडण, गुन्हेगारी विश्व याबद्दल त्याने भाष्य केलं. हे सगळं असताना काही लोकांनी त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं तो म्हणाला.
एमसी स्टॅन म्हणाला की, आमच्या मित्राचा वाढदिवस होता. आम्ही त्याचा केक कापला आणि इतक्यात काही लोकांनी त्याला मारण्यास सुरूवात केली. मानेवर तलवारीने वार केला तर दुसऱ्यान डोक्यात वार केला. हे सगळं आमच्या समोर सुरू होतं. माझ्या बाबतीतही दोन-तीन वेळा असं घडलं आहे. पी-टाऊनमधील काही लोकांनी मला जीवे मारण्याची इच्छा होती. त्यांनी तसा प्रयत्न केला होता. तीन-चार वेळा ते मला मारण्यासाठी धावले होते. पण देवाच्या कृपेने मी दरवेळी वाचलो, असं तो म्हणाला.