“मला तुझा…”, दीपिकाचा ‘गहराइयां’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर रणवीरची ‘ती’ पोस्ट चर्चेत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/deepika-padukone-ranveer-singh.jpg)
मुंबई |
बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोण ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या दीपिका ही ‘गहराइयां’ तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘गहराइयां’ चित्रपट ११ फेब्रुवारीला ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील बोल्ड सीनमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेता रणवीर सिंहने दीपिकासोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. यात ते दोघेही किस करताना दिसत आहेत.
रणवीर सिंहने काल संध्याकाळी उशिरा दीपिकासोबतचा सर्वात रोमँटिक फोटो शेअर केला आहे. रणवीरने शेअर केलेला हा फोटो पाहून दीपिकाच्या ‘गहराइयां’ चित्रपटातील बोल्ड सीनची पाहायला मिळत आहे. यात ते दोघेही किस करताना एकमेकांमध्ये हरवून गेल्याचे दिसत आहेत. या चित्रपटासाठी रणवीर सिंहने आपल्या पत्नीचे कौतुक केले आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे.
https://www.instagram.com/p/CZ1m3zbBc4i/?utm_source=ig_embed&ig_rid=95792818-8110-4110-a286-5f7249f7e66c
रणवीर सिंहने दीपिकाला किस करतानाचा फोटो शेअर करताना एक अनोखे कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये दीपिका पदुकोणच्या ‘गहराइयां’ चित्रपटातील डूबे या गाण्यातील शब्दाचा उल्लेख केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना तो म्हणाला, डूबे…हा डूबे…एक दुजे मै यहाँ…, फारच आश्चर्यकारक कामगिरी, उत्कृष्ट, सर्वोत्तम आणि आश्चर्यकारक! किती आश्चर्यकारक कामगिरी, किती उत्कृष्ट मास्टरक्लास कामगिरी, अतिशय सुरेख. सुरेख आणि हृदयस्पर्शी कलाकृती! यामध्ये तुम्ही तुमचे सर्वोत्तम दिले आहे. मला तुझा अभिमान आहे.
दीपिका आणि रणवीरच्या कामाबद्दल बोलायचं तर ते दोघंही ‘८३’ चित्रपटात एकत्र दिसले होते. याशिवाय दीपिकाचा ‘गहराइयां’ हा चित्रपट नुकताच अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात दीपिकासोबत सिद्धांत चतुर्वेदी, अनन्या पांडे आणि धैर्य कारवा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन शकुन बत्रा यांनी केलं आहे.
दरम्यान, दीपिका लवकरच सिद्धार्थ आनंद यांच्या पठान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. या व्यतिरिक्त हृतिक रोशनसोबत ‘फाइटर’ या चित्रपटात दिसणार आहे.