बहुप्रतिक्षित ’83’ चा ट्रेलर प्रदर्शित!
![Long awaited '83' trailer released!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/83.jpg)
मुंबई – खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर, बहुप्रतीक्षित चित्रपट ’83’च्या निर्मात्यांनी भारताच्या प्रतिष्ठित क्रिकेट मॅचच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे. अविश्वसनीय सत्यकथा, ज्याने अकल्पनीयतेला आपल्याकडे आकर्षित केले होते, तो क्रिकेट ड्रामा 24 डिसेंबर 2021 ला मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.
https://www.instagram.com/p/CW4nonionNW/?utm_source=ig_embed&ig_rid=bf434cdf-ab68-4f77-869c-e962718c7428
कबीर खान यांच्याद्वारे दिग्दर्शित ’83; हा वर्षातील सर्वात प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपट भारताच्या ऐतिहासिक 1983च्या विश्व कप विजयाची कहाणी आहे. रणवीर सिंह या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 83 ला सादर करण्यात येणार आहे. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्सचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 3 डी प्रदर्शित होणार आहे.