कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौतचा दबदबा
![Kangana Ranaut, Emergency, Film, Trailer, Launch, Indira Gandhi, Bhumika, Domination,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/indira-780x470.jpg)
मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत हिचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असलेला इमर्जन्सी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर इमर्जन्सी चित्रपटाच्या ट्रेलरला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमणही ‘इमर्जन्सी’ चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. मिलिंद सोमणने सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना राणौतचा दबदबा पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेते अनुपम खेर आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांचीही झलक पाहायला मिळत आहे.
कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इंदिरा गांधी यांचे त्यांचे वडील दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याशी असलेलं नातं दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत युद्धे आणि राजकीय अशांतता यासारख्या अनेक गंभीर समस्या कशा हाताळल्या हे देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटाची कथा
कंगना रणौतच्या बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपटात देशातील 21 महिन्यांच्या आणीबाणीची कथा दाखवण्यात येणार आहे. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 49 वर्षांपूर्वी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली होती. या काळात देशातील जनतेचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले होते. संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. आणीबाणी लागू करणे म्हणजे देशात सध्या सुरू असलेली अस्थिरता असल्याचं म्हटलं जात होतं. आता या चित्रपटातून आणबाणीची कथा रुपेरी पडद्यावर समोर येणार आहे.
इमर्जन्सी चित्रपटातून आणीबाणीची गोष्ट उलगडणार
भारतात आणी बाणी लागू होण्याच्या 50 व्या वर्षपूर्तीला कंगना रणौतने इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली होती. 6 सप्टेंबरला इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. कंगना रणौतने याआधी लोकसभा निवडणुकीमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख पुढे ढकलली होती.