#KalankTrailer : प्रेमाच्या त्रिकोणाचा ‘कलंक’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/kalank-trailer.jpg)
आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, माधुरी दीक्षित, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘कलंक’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये भव्यदिव्य दृश्य आणि डोळे दिपवणारे सेट पाहायला मिळतात. जफर आणि रुपची ही प्रेमकथा आणि त्या प्रेमकथेत येणारे अडथळे ट्रेलरमध्ये अधोरेखित होतात. ट्रेलरमध्ये आणखी एका कलाकारावरून पडदा उचलण्यात आला आहे. तो म्हणजे कुणाल खेमू.
सोनाक्षी सिन्हाचा पती आदित्य रॉय कपूर आलियाशी लग्न करतो. नंतर आलिया वरुणच्या प्रेमात पडते आणि ट्रेलरअखेर आदित्य-वरुण-आलियाच्या प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो. चित्रपटात कियारा अडवाणी आणि क्रिती सनॉन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.
माधुरी या चित्रपटात ‘बेगम बहार’च्या भूमिकेत आहे. तर आलिया भट्ट ‘रुप’ या राजकुमारीची भूमिका साकारत आहे. वरुण धवन जफरच्या भूमिकेत आहे. अत्यंत निर्भय आणि नेहमीच संकटाची दोन हात करायला तयार असणारा जफर असतो. सोनाक्षी ‘सत्या चौधरी’, संजय दत्त ‘बलराज चौधरी’ आणि आदित्य ‘देव चौधरी’च्या भूमिकेत आहे.
‘हा एक असा चित्रपट आहे, ज्यावर मी सर्वस्व झोकून काम केलं आहे. हा चित्रपट माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. असं स्वप्न ज्यावर त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी काम केलं आहे. हे स्वप्न मी तेव्हा पूर्ण करु शकलो नाही. पण, त्या स्वप्नाला एक दिशा मात्र नक्की मिळाली आहे….’, असं लिहित करणनं या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या होत्या. धर्मा प्रॉडक्शन्स निर्मित हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.