जान्हवी कपूर च्या बोल्ड ड्रेसला मिळाली साडीच्या पिनांची मदत नाही तर…
![Janhvi Kapoor's bold dress got the help of saree pins if not...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/534043-gefwef.webp)
अभिनेत्री जान्हवी कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. सध्या सोशल मीडियावर जान्हवीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा चाहत्यांना घायाळ तर करतच आहेत, पण घातलेल्या ड्रेसमुळे अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
जान्हवीचा ड्रेस
व्हिडीओमध्ये जान्हवीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. काहींना जान्हवीच्या नव्या ड्रेसमधील लूक आवडला आहे, तर काहींनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. कारण जान्हवीने घाललेल्या ड्रेसला सर्व बाजूंनी साडीची पिनं लावली आहेत.
ऐरवी महिला साडी नेसल्यावर पिन दिसू नये म्हणून प्रत्येक महिला प्रयत्न करते, पण जान्हवीचा ड्रेस पिनांमुळे टिकला असल्याचं दिसून येत आहे. सध्या जान्हवीचा सर्वत्र चर्चाचा विषय ठरत आहे.
जान्हवीचं नवीन घर
सोशल मीडियावर जान्हवी नव्या लूकमुळे चर्चेत आहे, तर दुसरीकडे जान्हवीने 10 – 20 कोटी रुपयांचं नाही तर तब्बल 65 कोटी रुपयांचं Duplex घर खरेदी केलं आहे. जान्हवीने वयाच्या 25 (janhvi kapoor age) व्या वर्षी कोट्यवधी रुपयांचं घर विकत घेतलं आहे. मिळालेल्या
माहितीनुसार, जान्हवीच्या नवीन घराचं क्षेत्रफळ 8 हजार 669 स्क्वेअर फूट आहे. ज्याचं कार्पेट क्षेत्र 6 हजार 421 चौरस फूट आहे. नव्या प्रॉपर्टीची नोंदणी अभिनेत्रीने 12 ऑक्टॉबर रोजी केली. त्यासाठी अभिनेत्रीने 3.93 कोटी रुपये मोजले.