भारतीय सिनेप्रेमींना लाइव्ह पाहता येणार ऑस्कर सोहळा! जाणून घ्या कधी व कुठे?
![Indian cinephiles can watch the Oscar ceremony live](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Oscars-2024--780x470.jpg)
Oscars 2024 | मनोरंजन विश्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराची प्रत्येक कलाकार आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा लॉस एंजेलिसमध्ये पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन अमेरिकेत १० मार्च रोजी करण्यात आलं आहे. भारतीय प्रेक्षकांना यंदा हे पुरस्कार कधी व कुठे पाहता येतील? जाणून घेऊयात..
भारतीय प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं लाइव्ह टेलिकास्ट ११ मार्चला पहाटे ४ वाजता डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. यासंदर्भातील माहिती हॉटस्टारच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर पोस्ट करून दिली आहे. ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचं लाइव्ह स्ट्रिमिंग ११ मार्चला होणार आहे. तयार व्हा! असं कॅप्शन या पोस्टला देण्यात आलं आहे.
हेही वाचा – शिवभक्तांनो… त्र्यंबकेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त २४ तास खुलं राहणार
क्रिस्टोफर नोलनच्या ‘ओपनहायमर’ या ब्लॉकबस्टर सिनेमाला ‘ऑस्कर २०२४’ मध्ये सर्वाधिक नामांकन मिळालं आहेत. या सिनेमाला एकूण १३ नामांकन मिळाले आहेत. याशिवाय ‘बार्बी’, ‘पूअर थिंग्स’ आणि ‘किलर्स ऑफ द फ्लॉवर मून’ या चित्रपटांमध्ये देखील चांगलीच चुरस रंगणार आहे.