केतकी चितळे सापडली पुन्हा नव्या वादात, नेटकऱ्यांकडून होतेय चांगलीच ट्रोल
![How many Chitales have been found in a new controversy, netizens are trolling a lot](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/ketaki-chitale-780x470.jpg)
इन्स्टाग्रामवरील एक व्हिडीओमुळे केतकी चितळेची पुन्हा नव्या वादात
मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या अभिनयापेक्षा बेधडक वक्तव्यांसाठी अधिक प्रसिद्ध आहे. केतकी सोशल मीडियावरही तिची मतं परखडपणे मांडत असते. तिने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. तिच्या या पोस्टमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी तिला चांगलीच खरी खोटी सुनावली आहे. आता केतकीने या सर्व प्रकरणावर सडेतोड उत्तर दिले आहे.
केतकी चितळेने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री १२ च्या सुमारास इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने तिच्या हातावर गोंदलेला एक टॅटू दिसत आहे. हा टॉटू वरील नंबर ती जेल मध्ये असतानाचा असल्याचं बोललं जात आहे. त्याबरोबरच तिच्या हातात दारुचा एक ग्लासही पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये असंही लिहिलं की, “मैं कट्टर सनातन हिन्दू हूँ लेकिन इसका मतलब यह नहीं की बाकी सब १००% गलत है।”. तिच्या हातातील दारुचा ग्लास पाहून नेटकरी संतापले आहेत. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान केतकी चितळेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यापुर्वी, केतकीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर केतकीला तुरुंगवारी करावी लागली होती. गेल्यावर्षी मे महिन्यात घडलेल्या घटनेनंतर केतकी विशेष चर्चेत आहे. हिंदू सनातन धर्म, epilepsy या विषयांवर ती परखड मतं मांडते. त्याचप्रमाणे टीका करणाऱ्यांना चोख उत्तर द्यायलाही ती मागेपुढे पाहत नाही. मात्र आता केतकीने केलेली कमेंट तिच्या फॉलोअर्सनाही पटलेली नाही, तर काहींनी तिला पाठिंबा दिला आहे. कमेंट सेक्शनमध्ये केतकी आणि त्या युजरमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचेही पाहायला मिळाले.